Ghatkopar Hoarding Accident : फक्त होर्डिंगच नाही, घाटकोपरमधील पट्रेल पंप सुद्धा अनधिकृत...?
Continues below advertisement
Ghatkopar Hoarding Accident : मुंबई: दोन दिवसांपूर्वी मुंबईत झालेला जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर परिसरात एक भलेमोठे लोखंडी होर्डिंग कोसळले (Hoarding collapse) होते. हे होर्डिंग शेजारच्या पेट्रोलपंपावर कोसळले होते. त्यामुळे पेट्रोल पंपावरील अनेक लोक होर्डिंगखाली दबले होते. या दुर्घटनेला आता 45 तास उलटल्यानंतरही याठिकाणी बचावकार्य सुरु आहे. हे बचावकार्य अंतिम टप्प्यात असून आता मुंबई महानगरपालिका, एनडीआरएफ आणि मुंबई पोलिसांकडून लोखंडी ढिगारा उपसण्याचे काम वेगाने सुरु आहे. त्यासाठी पोकलेन आणि गॅस कटरचा वापर केला जात आहे. गॅस कटरच्या साहाय्याने लोखंडी होर्डिंगचे तुकडे करुन ते क्रेनच्या साहाय्याने बाजूला घेतले जात आहे. यादरम्यान बचाव पथकांना होर्डिंगखाली दबलेली गाडी नजरेस पडली आहे.
Continues below advertisement