Ghatkopar Hoarding Video : मुंबई होर्डिंग दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू, अजूनही 30 जण अडकल्याची भीती
abp majha web team
Updated at:
13 May 2024 09:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई: घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून झालेल्या अपघातात आतापर्यंत 8 जणाचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे. या घटनेत 66 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी अद्याप मदतकार्य जारी असून घटनेच्या ठिकाणी अजून 25 ते 30 जण अडकल्याची माहितीही देण्यात आली आहे. त्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.