Gautam Adani Meets Sharad Pawar : अदानी भेटले कुणाला, खटकले?

Continues below advertisement

उद्योगपती गौतम अदानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची त्यांच्या मुंबईतल्या सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत त्या दोघांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली. पवार आणि गौतम अदानी यांच्यामध्ये झालेल्या चर्चेचा तपशील नेमका काय होता, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. पण अदानी आणि पवारांमध्ये जुने संबंध आहेत. राज्यात मविआचं सरकार असताना अदानींनी बारामतीला भेट दिली होती. या भेटीत बारामतीत सायन्स अँन्ड इनोव्हेशन अॅक्टिविटी सेंटरचं उद्घाटन पार पडलं होतं. हिंडेनबर्ग अहवाल प्रकरणात अदानी अडचणीत आल्याचं चित्र असताना, पवारांनी अन्य विरोधकांपेक्षा वेगळी भूमिका घेतली होती. या प्रकरणात सुप्रीम कोर्टानं चौकशी समिती स्थापन केल्यानंतर जेपीसीची  गरज नसल्याचं पवारांनी म्हटलं होतं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram