Kamothe Navi Mumbai : तान्ह्या मुलीची विक्री करणाऱ्या टोळीस अटक, एक डॉक्टर तीन महिला अटकेत
बाळाची चार लाखात विक्री करणार्या डॉक्टर आणि दोन महिलांना कामोठे पोलिसांनी रंगेहात पकडून अटक केले आहे. अटक केलेल्या डॉक्टरचे कामोठ्यात स्वतःचे क्लिनिक आहे. पंकज पाटील असे या डॉक्टरचे नाव आहे. पंकज पाटील यांनी मुलगी असलेल्या बाळाचा अवघ्या चार लाखात सौदा करून बाळाची विक्री केली होती. सध्या हा डॉक्टर कामोठे पोलिसांच्या ताब्यात आहे. कामोठे सेक्टर 8 मधील फॅमेली हेल्थ केअर असे क्लिनिक चालवणारा डॉक्टर एका लहान बाळाची 4 लाखाला विक्री करणार असल्याची माहिती कामोठे पोलीस ठाणे ला
मिळाली होती.