Lalbaugcha Raja 2021 : ही शान कोणाची... 'लालबागच्या राजा'ची; लालबागच्या राजाची प्रतिष्ठापना!

Continues below advertisement

लालबागच्या राजाच्या भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. लालबागचा राजा (Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal)यंदा विराजमान झाला आहे.  गेल्या वर्षी कोव्हिड 19 संसर्गामुळे लालबागचा राजा सर्वजनिक गणेशोत्सव मंडळने 'आरोग्य उत्सव' साजरा केला होता. यावर्षी मात्र राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व नियमांचे पालन करून गणेश उत्सव साजरा केला जाणार असल्याचे कार्याच्या मंडळाच्या बैठकीत ठरले. लालबागचा राजा चे ॲानलाईन दर्शन भाविकासाठी शुक्रवार 10 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून ते रविवार 19 सप्टेंबर 2021 सकाळी 7  वाजेपर्यंत 24 तास चालू राहिल. या उत्सवाचे थेट प्रक्षेपण मंडळाच्या अधिकृत सोशल मिडिया साईटवर उपलब्ध असेल.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram