Ganeshotsav 2023: गणपती बाप्पाच्या आगमनात खराब रस्त्यांचं 'विघ्न' ?
Continues below advertisement
Ganeshotsav 2023: गणपती बाप्पाच्या आगमनात खराब रस्त्यांचं 'विघ्न' ? पावसाळ्यात रस्त्यावरील खड्ड्यांचा त्रास मुंबईकरांना सातत्यानं होत असतो. मात्र हे खड्डे आता गणपती बाप्पांच्या आगमनातही अडचणीचे ठरतात की काय, अशी भीती व्यक्त करण्यात येतेय. मुंबईतील लालबाग आणि परळ भागातील आगमन मार्गांचा आढावा बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीनं १५ ऑगस्ट रोजी घेतला. यावेळी त्यांना अनेक समस्या लक्षात आल्या. खड्डे, असमतोल रस्ते आणि झाडांच्या वाढलेल्या फांद्या या तीन प्रमुख समस्या समितीच्या निदर्शनास आल्या. यावर उपाय करण्याची मागणी पालिकेच्या एफ दक्षिण विभागाकडे अर्जाद्वारे करण्यात आली आहे.
Continues below advertisement