Ganesh Chaturthi : नवी मुंबई विमानतळाचा देखावा, विमानतळाला दि.बा पाटलांचं नाव

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण मुद्दा रायगड आणि ठाणे जिल्ह्यात चांगलाच गाजत आहे. गणेशोत्सवात सुध्दा भक्तांनी आपल्या डेकोरेशनच्या माध्यमातून नामकरण प्रश्न लावून धरला आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव  देण्यासाठी चे डेकोरेशन आसूडगावातील विजय भोपी यांनी आपल्या घरात केले आहे. भूमिपुत्रांनी गणपती बाप्पाला साकडे घालत गणपती भोवती विमानतळाची आरास तयार केली आहे. या विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव दिलेले बोर्ड दाखविण्यात आले आहेत. गणेशोत्सवात आंदोलनाची ही धग जिवंत ठेवण्यासाठी आरास आणि सजावट याचा वापर अभिनव पद्धतीने भूमिपुत्रांनी करून घेतला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola