FYJC Admission : नामांकित काॅलेजेसमध्ये कट ऑफ नव्वदीपार ABP Majha

Continues below advertisement

तुमच्या मुलांना हव्या त्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळणं यंदा थोडी कठीणच झालंय. कारण यंदा परीक्षा न घेता लागलेल्या बारावी निकालात विद्यार्थ्यांना जणू गुणांची खैरातच वाटण्यात आली...परिणामी कॉलेजच्या कट ऑफ यादीची टक्केवारीही वाढली. दरवर्षीपेक्षा यंदा मुंबईतील कॉलेजचा कटऑफ नव्वदीपार गेलाय. काही नामांकित कॉलेजमध्ये यंदा कट ऑफ यादीत ३ ते ४ टक्क्यांनी वाढ झालीय. अनेक नामांकित महाविद्यालयांच्या कला शाखेची गुणवत्ता यादी नव्वदीपार तर काही कॉलेजनं तर थेट ९५ टक्के पार गुणवत्ता यादी जाहीर केली. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांमध्ये नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी चांगलीच स्पर्धा होणारे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram