ABP News

Abhishek Ghosalkar Funeral : अभिषेक घोसाळकर यांची अंत्ययात्रा तेअंत्यसंस्कार UNCUT

Continues below advertisement

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झालं असून त्यांच्या धाकट्या भावाने त्यांना अग्नी दिला. यावेळी हजारो कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू आल्याचं दिसून आलं.  अभिषेक घोसाळकर यांची मॉरिन नोरोन्हा या व्यक्तीने गुरूवारी संध्याकाळी गोळ्या घालून हत्या केली होती. उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी आज विनोद घोसाळकर यांच्या घरी भेट दिली आणि त्यांचं सात्वन केलं. अभिषेक घोसाळकर आणि नोरोन्हा गुरूवारी संध्याकाळी एकत्र फेसबुक लाईव्ह करत होते. लाईव्ह संपत आलं तेव्हा मॉरिस खोलीतून बाहेर गेला, त्यानं पिस्तुल काढलं आणि पुन्हा खोलीत शिरुन घोसाळकरांवर गोळीबार केला. अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या गोळीबार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram