Ajit Tawade | छत्रपती पुरस्कार विजेत्या अजित तावडेंचं एअर रायफल शूटींग फंडामेंटल्स पुस्तकाचं प्रकाशन | ABP Majha
छत्रपती पुरस्कार विजेत्या अजित तावडे यांनी लिहिलेल्या एअर रायफल शूटिंह फंडामेंटल्स या पुस्तकाचं प्रकाशन नुकतंच विलेपार्ल्यात संपन्न झालं. नेमबाजी प्रशिक्षक संजय चक्रवर्ती आणि माजी आंतरराष्ट्रीय नेमबाज दीपाली देशपांडे यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं. विलेपार्ल्याच्या जनसेवा समितीनं या पुस्तकाचं प्रकाशन केलं. नवोदित नेमबाजांना या पुस्तकाचा लाभ होईल, असं तावडे यांनी म्हटलं आहे.