शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोईर नवी मुंबईच्या आंदोलनात, मनसेच्या राजू पाटलांचीही वेगळी भूमिका
नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळाला नाव कोणाचं द्यायचं? यावरुन सध्या वाद पेटला आहे. नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील (Di Ba Patil)यांचे नाव देण्याची मागणी स्थानिक प्रकल्पग्रस्त नागरिकांची आहे तर शिवसेनेकडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी होत आहे. दि बा पाटील यांचं नाव विमानतळाला देण्यात यावं यासाठी नवी मुंबईतील भूमिपूत्रांकडून आज नवी मुंबईतील सिडकोवर आंदोलन करण्यात आलं. आंदोलनास सुरुवात करण्याआधी आंदोलक नेत्यांकडून दि बा पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर आंदोलनास सुरुवात करण्यात आली.
Tags :
Shivsena MNS Raju Patil Di Ba Patil Navi Mumbai Airport D B Patil Navi Mumbai Protest Subhash Bhoir