Dadar : मंदिर बंद असल्याने फुलांची मागणी कमी, सणवार असूनही फुलांचे दर गडगडले, शेतकऱ्यांना फटका
श्रावण महिना हा धार्मिक महिना म्हणून ओळखला जातो. श्रावण महिन्यात विविध प्रकाराच्या फुलांना मागणी असते. या काळात झेंडू साधारण 60-70 रुपये दराने विकला जातो. मात्र, सततच्या पावसामुळे भिजलेली फुले दर पाडून विकावी लागत आहेत. कोरोनामुळे मंदिरं देखील बंद आहेत, धार्मिक उत्सवावर मर्यादा आहेत, त्यामुळे फुलांच्या मागणीत घसरण झाली आहे.