Firing outside Salman Khan Home: सलमान खानच्या गोळीबाराचा बिश्नोई गँगशी संबंध ?

Continues below advertisement

Firing outside Salman Khan Home: सलमान खानच्या गोळीबाराचा बिश्नोई गँगशी संबंध ? अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झालाय. पहाटे पावणे पाचच्या सुमारास ही घटना घडलीये. दुचाकीवरुन आलेल्या २ अज्ञातांनी सलमानच्या घराबाहेर चार राऊंड फायरिंग केलीये. सध्या फॉरेन्सिक टीम सलमानच्या घराबाहेर दाखल झाली असून अधिक तपास सुरु आहे.. ज्या ठिकाणी हे फायरिंग झालंय त्या ठिकाणी फॉरेन्सिक टीमकडून स्पॉटींग करण्यात आलंय. तर परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे अधिक तपास सुरु आहे.. यापूर्वी सलमान खानचे वडील सलीम खान यांना घराबाहेर सकाळी जॉगिंग करत असताना  2022 मध्ये  एक चिठ्ठी द्वारे धमकी देण्यात आली होती. यामध्ये मुसेवाला जैसा कर देंगे असं लिहिण्यात आलं होतं..त्यामुळे सलमान खानची सुरक्षा देखील वाढवण्यात आली होती...यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव पिस्तूल चा लायसन देखील देण्यात आले होते.. तसेच खाजगी सुरक्षारक्षकांमध्ये देखील वाढ करण्यात आली होती..त्यात पुन्हा ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram