Vasai Covid Hospital Fire | काही चुका असतील त्या पाहायलाच लागतील : हितेंद्र ठाकूर
वसईमधील कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या भीषण आगीत तब्बल 13 रुग्णांचा मृत्यू झाला. विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ही आग लागली होती. या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात एकूण 17 रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यापैकी 13 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला आता यश आलं आहे. या संपूर्ण घटनेवर हितेंद्र ठाकूर काय म्हणाले?