ABP Majha Impact : मेलेल्या कोंबड्यांच्या चिकन प्रकरणी अखेर जे.जे मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Continues below advertisement
मेलेल्या कोंबड्यांचे चिकन मुंबईत राजरोसपणे विकलं जातं असल्याचं वास्तव एबीपी माझानं उघड केल्यानंतर प्रशासन कामाला लागलंय. एबीपी माझाने केलेल्या स्टिंगची दखल अन्न व औषध प्रशासनाने देखील घेतली आहे. मेलेल्या कोंबड्यांच्या चिकन प्रकरणी जे.जे मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय. तसेच स्थानिक प्रशासनसोबत पथके तयार करून राज्यभर तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री आणि आयुक्तांनी पत्रव्यवहार देखील केला आहे.
Continues below advertisement