Mumbai FS Fire: फॅशन स्ट्रीटवरची 20 ते 22 कपड्यांची दुकानं जळून खाक, दुपारी 1 वाजता लागली आग
मुंबईत शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या फॅशन स्ट्रीटवरील आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय.. दुपारी एकच्या सुमारास ही आग लागली.. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या.. जवळपास तासभराच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण अग्निशमन दलाला यश आलं. या आगीत २० ते २२ कपड्यांची दुकानं जळून खाक झालीत.. त्यामुळे हातावर पोट असलेल्या कापड व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालंय.. डोळ्यादेखत दुकानं जळताना पाहून अनेक कापड व्यावसायिकांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले..
Tags :
Fire Brigade Shopping Textile Business Fashion Street Famous Major Damage Fire Control MUMBAI 1 Pm