Fake Doctor : सावधान! मुंबईत बोगस डॉक्टरचा पर्दाफाश, बारावी नापास असतानाही करत होता प्रॅक्टिस
Continues below advertisement
मुंबईतील दिंडोशी परिसरामध्ये पोलिसांनी एका बोगस डॉक्टरचा पर्दाफाश केलाय. सुकेश गुप्ता असं या व्यक्तीचं नाव आहे.. बारावी नापास असतानाही सुकेश गुप्ता डॉक्टर असल्याचं नकली सर्टफिकेट दाखवत प्रॅक्टिस करत होता. महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी आणि पोलिसांना याबाबत माहिती मिळाली त्यानंतर सापळा रचत पोलिसांनी सुकेश गुप्ताच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्या क्लिनिकमधील बोगस सर्टिफिकेट, औषधं आणि इतर सर्टिफिकेट पोलिसांनी जप्त केलंय.
Continues below advertisement