उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात 12 ते 14 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा
Continues below advertisement
बंगालच्या उपसागरात तयार झालेलं कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र, पुढील 48 तासात उत्तर उडीशा, उत्तर छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातून प्रवास करत पुढे सरकेल. उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात 12 ते 14 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा. घाट माथ्यांवर काही ठिकाणी 200 मिमीपेक्षा अधिक पावसाची शक्यता. भारतीय हवामान विभागाकडून इम्पॅक्ट वाॅर्निंग जारी. पूर येणे, सखल भागात पाणी साचणे, दरड कोसळणे, कच्च्या घरांची पडझड होणे, दृश्यमानता कमी होणे त्याचसोबत सखल भागात पाणी साचल्याने ट्रॅफिकला अडथळा देखील येण्याची शक्यता, जोरदार वाऱ्यामुळे पिकांना नुकसान होण्याचा अंदाज. पुढील 3-4 तास रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, सातारा, आणि पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता.
Continues below advertisement