Wildlife Smuggling | मुंबई विमानतळावर परदेशी प्राण्यांची तस्करी उघड, एकाला अटक

Continues below advertisement
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशी प्राण्यांची तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. बँकॉकहून आलेल्या शाहरुख खान मोहम्मद हसीन नावाच्या प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून अनेक परदेशी प्राणी जप्त करण्यात आले आहेत. जप्त केलेल्या प्राण्यांमध्ये अल्बिनो रेड इअर लाईडर जातीची पन्नास कासवं, सेवियोला प्रजातीची दोन पिग्मी मॉर्मोसेट माकडं आणि दोन किंग काजू यांचा समावेश आहे. ट्रॉली बॅगेतून या प्राण्यांची अवैध तस्करी सुरू होती. आरोपीला वन्यजीव संरक्षण अधिनियम आणि कस्टम्स कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे वन्यजीव तस्करीच्या गंभीर समस्येकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. विमानतळावर अशा प्रकारच्या तस्करीला आळा घालण्यासाठी अधिक कडक उपाययोजनांची गरज अधोरेखित झाली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola