EXCLUSIVE | आगीनंतर वसईतील विजय वल्लभ रुग्णालयाचा आयसीयू वॉर्ड बेचिराख
Continues below advertisement
वसईमधील कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या भीषण आगीत तब्बल 13 रुग्णांचा मृत्यू झाला. विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ही आग लागली होती. या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात एकूण 17 रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यापैकी 13 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला आता यश आलं आहे. आगीनंतर विजय वल्लभ रुग्णालयाचा आयसीयू वॉर्ड बेचिराख झाला आहे.
Continues below advertisement