Panvel Liquor Seized : पनवेलमध्ये एक कोटी आठ लाख रुपयांची दारु जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पनवेलमध्ये मोठी कारवाई केली आहे. गोव्यामध्ये बनवली जाणारी मात्र महाराष्ट्र मध्ये विक्री करण्यास प्रतिबंधित असलेल्या दारूचा साठा जप्त करत दोघांना अटक केलीय. जप्त केलेल्या दारुची किंमत तब्बल एक कोटी आठ लाख रुपये इतकी आहे. ट्रकच्या माध्यमातून दारुचे 1 हजार 300 बॉक्स आणले जात होते. कोणालाही संशय येऊ नये म्हणून दारुच्या बॉक्सवर काजूच्या सालींच्या गोण्या ठेवण्यात आले होत्या.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola