Kalyan : इमारतीतील लिफ्ट चक्क चोरीला, याआधी लाद्या, ग्रील, दरवाजेही चोरीला
Kalyan : केंद्र सरकारच्या कोट्यवधी रुपयाच्या निधीतून उभारण्यात आलेल्या बीएसयुपी योजनेतील इमारतीमधील घराची लाभार्थ्यांना प्रतीक्षा असताना या रिकाम्या इमारतीमधील लिफ्टच चोरी झाल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्वेतील कचोरे परिसरात घडली आहे. मात्र याबाबत पालिका प्रशासन अनभिज्ञ आहे. यापूर्वी या इमारतीमधील खिडक्याची तावदाने, ग्रील, दरवाजे, मीटरबॉक्स, विजेच्या वायर्स आणि अगदी लाद्या देखील चोरांनी पळवल्या असून आता इमारतीची लिफ्ट देखील काढून नेल्याने या इमारतिची वाताहत झाली आहे.