Eknath Shinde : टेंभी नाक्याच्या दही हंडसाठी स्वत: एकनाथ शिंदे ठाण्यात, कलारांचीही मांदियाळी
Dahihandi 2022 : देशभरात गोपाळकालाचा (Gopalkala) उत्साह पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात दहीहंडीचं (Dahihandi) वेगळं आकर्षण आहे. राज्यात दहीहंडीचा विशेष उत्साह दिसत आहे. मुंबई, ठाण्यासह पुण्यात दहीहंडीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. विविध मंडळांकडून दहीहंडी उत्सवात लाखोंच्या बक्षीस देण्यात येतात. गोविंदा पथकं अनेक महिने मानवी मनोरे लावण्यासाठी सराव करत असतात. कोरोना संकटामुळं यंदा तब्बल दोन वर्षांनी दहीहंडी साजरी होणार आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यातील गोविंदा पथकं मनोरे रचायला सज्ज झाले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून सुरक्षेची सर्वोतोपरी काळजी घेतली आहे.
Tags :
Dahi Handi Jai Jawan Mumbai Thane Eknath Shinde Gokul Ashthami Janmashthami Jai Jawan Govinda Pathak Tembhi Naka