Eknath Shinde : Liladhar Dake यांच्यानंतर एकनाथ शिंदे Manohar Joshi यांना भेटण्याची शक्यता

Continues below advertisement

Eknath Shinde Meets Liladhar Dake : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्त्वाखाली 40 आमदारांनी बंडखोरी केली आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडावी लागली. त्यानंतर 12 खासदारांनीही एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत गटात सामील झाले. आता एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांकडे मोर्चा वळवलेला दिसत आहे. शिवसेनेत नेतेपद भूषवणारे लीलाधर डाके (Liladhar Dake) यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले आहेत. तर संध्याकाळी ते माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते मनोहर जोशी (Manohar Joshi) यांची भेट घेणार आहेत. यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांची भेट घेतली होती. तर नेत्यांच्या यादीपैकी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ हे आधीच शिंदे गटात सहभागी झाले आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram