
Mumbai : राज्यात युतीला युतीनं उत्तर, ठाकरे-वंचितनंतर जोगेंद्र कवाडे शिंदे गटासोबत ABP Majha
Continues below advertisement
PRP-Balasahebanchi Shiv Sena Alliance : एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे पीपल्स रिपब्लिकन पक्ष (Peoples Republican Party) आणि बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shiv Sena) पक्षाची अखेर युती झाली आहे. मुंबईत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde ) आणि प्रा. जोगेंद्र कवाडे (Prof. Jogendra Kawade) यांनी पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली. "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीने प्रभावित होऊनच आम्ही युतीचा निर्णय घेतला आहे. गोरगरीबांच्या वंचितांच्या हक्कासाठी ही युती काम करेल," असं प्रा. जोगेंद्र कवाडे यावेळी म्हणाले.
Continues below advertisement