Thackeray vs Shinde:सत्तासंघर्षाचा तिढा सुटेना,उद्या केंद्रीय निवडणूक आयोगात ठाकरे-शिंदे गटात सामना

Uddhav Thackeray On Eknath Shinde : महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सुरु असताना शिवसेना ठाकरे गट (Shivsena Thackeray) आणि शिवसेना शिंदे (Eknath shinde) गट शिवसेना कुणाची? यावरुन एकमेकांसमोर आहे. उद्यापासून केंद्रीय निवडणूक आयोगात ठाकरे आणि शिंदे गटात (Thackeray vs Shinde) सामन्याचा नवा अंक रंगणार आहे. शिंदे गटाला आयोगाकडे धाव घेण्याचा हक्क नाही, अशी ठाकरे गटाची भूमिका आहे. तर दोन्ही गटांना बाजू मांडण्यासाठी 8 ऑगस्टपर्यंतची वेळ मिळाली होती. सुप्रीम कोर्टानंतर आता शिवसेना विरुद्ध शिंदे गट या लढाईचा दुसरा अंक उद्यापासून निवडणूक आयोगात रंगणार आहे. निवडणूक आयोगात शिवसेना उद्या पहिली मागणी स्थगितीचीच करणार असल्याची माहिती आहे.  सुप्रीम कोर्टाची सुनावणी सुरू असताना आयोगानं निर्णयाची घाई करू नये ही शिवसेनेची विनंती असणा आहे. शिवसेना पक्षाची घटना, गेल्या काही वर्षातल्या पक्षांतर्गत निवडणुकांचा इतिहास, त्या त्या पदांची जबाबदारी याचा गोषवारा निवडणूक आयोगाकडे सादर होणार आहे. 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola