Eid Ul Adha 2024 : बकरी ईदनिमित्त देशभरात उत्साह, ईद निमित्ताने मुंबईत उत्साह
आज देशभरासह राज्यात बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जातेय. इस्लाम धर्मात रमजाननंतर दुसरी सर्वात मोठी ईद म्हणून बकरी ईद समजली जाते. त्याग आणि समर्पणचे प्रतीक म्हणून बकरी ईद मुस्लिम बांधव साजरी करत असतात. राज्यातील विविध मशिदी आणि मदरशांमध्ये लाखो मुस्लिम बांधवांनी बकरी ईदची नमाज अदा केली. या ईद सणानिमित्त पोलिसांच्यावतीने कोटरगेट मशीद येथे मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा देऊन स्वागत करण्यात आलं. तर तिकडे नाशिकच्या नांदगावमध्ये करी ईदनिमित्त ईदगाह मैदानावर नमाज पठण करण्य़ात आलं. तसंच नमाज पठणानंतर वैचारिक आणि धार्मिक प्रबोधनही करण्यात आलं. तसंच सोलापुरातही बकरी ईद साजरी करण्यात आली. सोलापुरातील रंगभवन अहले हदीस ईदगाह येथे देखील मुस्लिम बांधवानी सामूहिक नमाज पठण करण्यात आले. या वेळी मुस्लिम बांधव हजारोच्या संख्येने नमाजसाठी उपस्थित होते.
मुंबईत बकरी निमित्ताने सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळतय. सकाळपासूनच मुस्लिम बांधव सामूहिक नमाज पठण करत, एकमेकांची भेट घेत ईद निमित्ताने एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. ईद निमित्ताने मुंबईत आज आनंदाचा आणि उत्साहाचा वातावरण पाहायला मिळतोय.