Eknath Khadse : प्रकृतीचं कारण देत पत्रकार परिषद रद्द ; एकनाथ खडसे ईडी चौकशीसाठी हजर राहणार?

Continues below advertisement

मुंबई : तुम्ही ईडीची चौकशी मागे लावाल तर मी सीडी लावेल, असा इशारा देत भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना आज सकाळी ईडीचं समन्स आलं आहे. आज सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश एकनाथ खडसेंना देण्यात आले आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरुन, एकनाथ खडसेंची प्रकृती खालावल्यामुळे त्यांची आजची पत्रकार परिषद रद्द केल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे एकनाथ खडसे आज चौकशीसाठी ईडी कार्यालयात उपस्थित राहणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात ईडीनं एकनाथ खडसेंची चौकशी केलेली आहे. तसेच काल (बुधवारी) एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. 

पुन्हा एकदा ईडीचा ससेमिरा एकनाथ खडसेंपर्यंत पोहोचला आहे. भोसरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीनं एकनाथ खडसेंना हे समन्स बजावलं आहे. काल ईडीनं एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरींना अटक केली आहे. भोसरी जमिन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसेंचे जावाई गिरीश चौधरी हे सध्या ईडीच्या अटकेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेते आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मागे ईडीच्या तपासाचा ससेमिरा लागल्याचं पाहायला मिळत आहे. अनिल देशमुख, प्रताप सरनाईक यांच्यानंतर आता एकनाथ खडसेंकडे ईडीनं मोर्चा वळवला आहे. भोसरी जमिन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरींना ईडीनं अटक केली आहे. मंगळवारी गिरीश चौधरी यांना ईडीनं चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले होते. रात्री उशीरापर्यंत ईडीकडून त्यांची चौकशी सुरु होती. अखेर चौकशी अंति ईडीकडून त्यांच्यावर रात्री उशीरा अटकेची कारवाई करण्यात आली. याप्रकरणी सध्या ईडीकडून तपास सुरु आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram