Droupadi Murmu देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदाची शपथ घेणार,शपथविधी सोहळ्याआधी मुर्मू राजघाटावर
Continues below advertisement
नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज, देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदाची शपथ घेणार आहेत. सकाळी सव्वादहा वाजता संसद भवन इथं हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे... भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमण्णा द्रौपदी मुर्मू यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील.... शपथविधी सोहळ्याआधी मुर्मू राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहतील. शपथविधी सोहळ्याला उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह राज्यपाल, मुख्यमंत्री उपस्थित राहतील. संसदेच्या सेंट्रल हॉलमधील शपथविधीनंतर मुर्मू राष्ट्रपती भवनाकडे रवाना होतील. तेथे त्यांना आंतर-सेवा गार्ड ऑफ ऑनर प्रदान करण्यात येईल.
Continues below advertisement