ABP News

Dr. Tatyarao Lahane: परवानगी नसतना डाॅ.तात्याराव लहानेंकडून 698 शस्त्रक्रिया ?

Continues below advertisement

Dr. Tatyarao Lahane: परवानगी नसतना डाॅ.तात्याराव लहानेंकडून 698 शस्त्रक्रिया ? जेष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी ६९८ शस्त्रक्रिया विनापरवानगी केल्याचा ठपका जे.जे रुग्णालयातील त्रिसदस्यीय समितीनं ठेवला आहे. ऑगस्ट ते डिसेंबर २०२२ या कालावधीत कोणत्याही पदावर नसताना डॉ. लहाने यांनी जेजे रुग्णालयात विनापरवानगी डोळ्यांच्या शस्रक्रिया केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबद्दलचा प्राथमिक अहवाल समितीनं रुग्णालय प्रशासनाला सादर केला आहे. नेत्ररोग विभागाच्या माजी प्रमुख डॉ. रागिणी पारेख यांना देखील रुग्णालय प्रशासनाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. डॉ. लहाने यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत. कोणतीही शस्रक्रिया विनापरवानगी करण्यात आलेली नाही. मी परवानगी घेऊनच काम सुरु केले होते. त्रिसदस्यीय समितीनं आमची बाजू जाणूनच घेतली नाही. या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही, असं लहाने म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram