Dombivli MIDC Blast Updates : डोंबिवलीत पुन्हा आगडोंब ! केमिकलच्या ड्रमचे धडाधड स्फोट

Continues below advertisement

Dombivli Blast News Updates : डोंबिवलीत पुन्हा आगडोंब !  केमिकलच्या ड्रमचे धडाधड स्फोट
ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाची आणि मोठी एमआयडीसी अससेल्लया डोंबिवली  एमआयडीसीमधील एका केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाल्याची दुर्घटना घडली आहे. या स्फोटानंतर आगीचे व धुराचे लोट संपूर्ण डोंबवली परिसरात पसरल्याचे पाहायला मिळाले. तब्बल 2 ते 3 किमी दूरपर्यंत या स्फोटाची तीव्रता जाणवली असून डोंबिवली परिसरातील रहिवाशी आणि शॉपिंग सेंटरच्या काच्या फुटल्याचेही दिसून आले. या दुर्घटनेत 20 ते 25 कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या जखमींना तत्काळ जवळी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. तर, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मात्र, कंपनीच्या गेट परिसरातच काळ्या धुराचे प्रचंड लोट असल्याने अग्निशमनच्या जवानांना आग विझवण्यासाठी पोहोचण्यास अडचण निर्माण झाली होती.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram