Dombivli : जागेच्या वादातून कुटुंबातील महिला, लहान मुलांना बेदम मारहाण ; व्हिडीओ व्हायरल

जागेच्या वादातून एका कुटुंबाला काही जणानी बेदम मारहाण केल्याची घटना डोंबिवली खोनी नजीक पागड्याचा पाडा येथे घडली आहे .धक्कादायक म्हणजे या मध्ये लहान मुलांना आणि महिलांना सुद्धा मारहाण करण्यात आली आहे एवढे नाहीतर घरात सर्व वस्तूंची तोडफोड करण्यात आली आहे .या मारहाणीचा व्हिडियो व्हायरल झाला असून या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. डोंबिवली पूर्वेतील खोणी नजीक पागड्याचा पाडा गावात आज दुपारी अडीच वाजता अरुण काळोखे यांच्या घरात काही लोक घुसले आणि त्यांनी अरुण यांच्यासह  लोकांना मारहाण सुरू केली अरुण काळोखे त्यांची पत्नी त्यांच्या लहान मुलांना बेदम मारहाण करण्यात आली. इतकेच नव्हे तर त्यांच्या घरात देखील तोडफोड करण्यात आली .जागेच्या वादातून ही हाणामारी झाली असल्याची माहिती अरुण काळोखे यांनी दिली आहे. अनेक दिवसापासून जागेवरून वाद  सुरू आहे. आज हा वाद विकोपाला गेला. डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.तसेच या घटनेत दुसऱ्या गटातील एक महिला सुद्धा जखमी झाली आहे .

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola