
Dombivali Crime : डोंबिवलीतील पाळणाघरात चिमुकल्यांना मारहाण
Dombivali Crime : डोंबिवलीतील पाळणाघरात चिमुकल्यांना मारहाण आपल्या चिमुरड्या मुलांना डे केअर सेंटर म्हणजेच पाळणाघरामध्ये ठेवून नोकरीवर जाणाऱ्या
पालकांना धक्का देणारी एक घटना उजेडात आली आहे. डोंबिवलीतील हॅपी किड्स डे केअर सेंटरमधल्या कर्मचाऱ्यांकडून मुलांना होणारी मारहाण आणि देण्यात येणाऱ्या संतापजनक वागणुकीचा व्हिडीओ उघडकीस आला आहे. त्यानंतर ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी कविता गावंड यांच्या मदतीनं संतप्त पालकांनी डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.पोलिसांनी आधी वेळकाढूपणा केला, पण त्यानंतर त्यांनी तक्रारीनुसार कारवाई केली. डोंबिवली पोलिसांनी पाळणाघर चालवणाऱ्या गणेश प्रभुणे आणि आरती प्रभुणे या दाम्पत्यासह राधा नाखरे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला आहे. चिमुकल्यांना मारहाण करणाऱ्या या विकृत प्रवृत्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.