Mumbai : बोरीवली इथं दहा भिंत रचून श्वानांना जिवंत गाडण्याचा प्रयत्न, पोलिसांत तक्रार दाखल
Mumbai : मुंबईत बोरीवली इथं दहा श्वानांना जिवंत गाडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. विसी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या पौर्णिमा शेट्टी दररोज जवळपास तीनशे भटके कुत्रे आणि मांजरींना जेवण देतात. मात्र बोरीवलीच्या देविदास लेनवर शेट्टी यांना २० ते २२ कुत्रे गायब असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर पौर्णिमा यांनी आजूबाजूच्या परिसरात पाहणी केली. त्यावेळी पार्किंगच्या मोकळ्या जागेत भिंत रचून श्वानांना जिवंत गाडण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आलं. प्राणीप्रेमीने ही भिंत फोडून सर्व कुत्र्यांना सुखरुप बाहेर काढलं. या प्रकरणी सोसायटी पदाधिकाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीय.