Diwali 2022 : दीपोत्सवावरुन राजकारण रंगलं; मुंबईत भाजपचं तर ठाण्यात शिंदे गटाचा दीपोत्सव

Continues below advertisement

निवडणूक चिन्हावरुन राजकारण रंगलं.... पक्षाच्या नावावरुन राजकारण रंगलं... दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मैदानावरुन राजकारण रंगलं... दहीहंडीतही श्रेयवादाचं राजकारण पाहायला मिळालंय... आणि हेच राजकारण आता दिवाळीनिमित्त साजरा होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये दिसून येतोय....भाजपने आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात जोरदार मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. दिवाळीच्या निमित्ताने भाजपच्या वतीने दीपोत्सवाचा आयोजन करण्यात आला आहे. आज पासून २३ ऑक्टोबरपर्यंत दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आला आहे.... तर तिकडे ठाण्यातही दिवाळी कार्यक्रमासाठी शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने आले होते... मुंबई हायकोर्टात झालेल्या सुनावणीत कोर्टानं ठाकरे गटाला धक्का देत शिंदे गटाला कार्यक्रमासाठी परवानगी दिलीए.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram