Diwali 2022 Ghatkopar : मुंबईतील डोंगराळ भागातील वस्त्या उजळल्या, आकर्षक रोषणाईची सुंदर दृष्य
दिवाळीचा उत्साह सगळीकडे दिसून येतोय, रंगीबेरंगी रोषणाई आणि नेत्रदीपक दीपोत्सवामुळे मुंबई आणखी आकर्षक वाटते आहे. मुंबईत जशा उंच इमारती आहेत तशाच उंच डोंगराळ झोपडपट्टीदेखील मोठ्या प्रमाणत आहेत. या डोंगराळ झोपडपट्टयांमध्ये करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईने डोंगरावर दीपोत्सव सुरू असल्याचा भास होतो आहे. घाटकोपर आणि विक्रोळी पार्कसाईटच्या मध्यावर असलेल्या राम नगर, खंडोबा टेकडी डोंगर असाच सुंदर विद्युत रोषणाई सजलाय.