Diwali 2020 | कोरोनामुळे यंदा मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराबाहेर शुकशुकाट
कोरोनामुळे मुंबईकर यंदाची दिवाळी शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करून साजरी करत आहेत. दरवर्षी मुंबईकर दिवाळीच्या पहाटे मुंबादेवी आणि सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन दिवाळी साजरी करत असतात. यंदा मात्र सिद्धिविनायक मंदिर परिसरात शुकशुकाट आहे. काही नागरिक मंदिराच्या बाहेरूनच सिद्धिविनायकाला नमस्कार करून प्रार्थना करताना दिसत आहेत.