Mumbai Local : दिवा रेल्वे स्थानकार गोंधळ, मुंबईच्या दिशेने जाणारी लोक 4 ऐवजी प्लॅटफॉर्म क्र. 2 वर
आज सकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी दिवा रेल्वे स्थानक येथे मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल ही प्लॅटफॉर्म क्रमांक ४ ऐवजी प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर आल्यामुळे प्रवासी संतप्त झाले.यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी १० मिनिट हून अधिक काळ ही लोकल थांबवून ठेवली.अखेर स्थानिक रेल्वे प्रशासनाने त्यांची समजूत काढल्या नंत लोकल रवाना झाली.दरम्यान लोकलसेवा सेवा सुरळीत सुरू असून फक्त काही काळ दिव्यात मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक चार वर ऐन्या ऐवजी दोन वर आल्यामुळे गोंधळ उडाला होता.