Disha Salian : दिशा सालियनचा मृत्यू हा अपघाती, घातपात नाही CBI च्या अहवालात माहिती
Disha Salian हिचा मृत्यू 8 जून 2020 रोजी झाला. 8 जूनच्या मध्यरात्री मुंबईतील मालाड येथील गॅलेक्सी रीजेंट इमारतीच्या 14व्या मजल्यावरून 28 वर्षीय दिशा पडली होती. द इकोनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, टॅलेंट मॅनेजर दिशा सालियनचा मृत्यू हा अपघाती होता, असा निष्कर्ष सीबीआयने तपासानंतर काढला आहे. सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह वांद्रे येथील भाड्याच्या घरात सापडण्याच्या पाच दिवसांपूर्वी दिशाचा मृत्यू झाला.