Disha Salian Case : दिशा सालियनच्या आई-वडिलांची राणे पितापुत्रांविरोधाच महिला आयोगाकडे तक्रार
केंद्रीय मंत्री नारायण राणे खोटं बोलले का? हा प्रश्न विचारण्यामागचं कारण आहे दिशा सालियनच्या आई-वडिलांच्या डोळ्यातले अश्रू... राजकीय स्वार्थासाठी आमच्या मुलीची नाहक बदनामी केली जातेय... दिशा सालियन हिची हत्या झालीच नव्हती... तिचा पोस्ट मार्टेम रिपोर्टही आलाय... अशी माहिती आज दिशा सालियनच्या आई-वडिलांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. आणि आपली व्यथा मांडताना दिशाच्या माता-पित्याच्या डोळ्यात अश्रू उभे ठाकले होते.. दिशा सालियनवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप नारायण राणेंनी शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केला होता. मात्र राजकीय नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांमुळं आमचं जगणं मुश्कील झालंय.. अशी व्यथा दिशा सालियनच्या आई-वडिलांनी बोलून दाखवली.. दिशाच्या पालकांनी नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या नावानिशी महिला आयोगाकडे तक्रार केली आहे..