Dikshabhumi Buddha Idol: थायलंडमधून आणलेल्या 400 किलोच्या अष्टधातू मुर्तीची दीक्षाभूमीत प्रतिष्ठापणा

Continues below advertisement

थायलंडमधून आणण्यात आलेली 400 किलो वजनाची अष्टधातूची 9 फुुट उंच तथागत गौतम बुद्धाच्या मूर्तीची स्थापना नागपुरातील दीक्षाभूमीतील स्तूपात करण्यात आली. थायलंडमध्ये जवळपास आठ महिन्या पासून ही मूर्ती तयार करण्यात येत होती. थायलंड येथील एका दांपत्याने दीक्षाभूमी येथे मूर्ती द्यावी अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर ही मूर्ती तयार करण्यात आली. थायलंडचे भिक्कु संघाचे सचिव भन्ते महाकायिक यांच्यासह 24 भन्ते यांच्या उपस्थितीत प्रार्थना करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी कलशासमोर तथागत गौतमाची मूर्तीची स्थापना करण्यात आली. ध्यानस्थ मुद्रेत असणारी ही  मूर्ती लोभस असून लक्ष वेधून घेत आहे. या भाव मुद्रेतील ही जगातील एकमेव मूर्ती ठरावी अशी काळजी मूर्ती निर्माणकर्त्यांनी घेतली आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram