Trans Harbour मार्गावरील दिघा रेल्वे स्थानक होणार सुरू, राजन विचारेंनी केली कामाची पाहणी
Continues below advertisement
ट्रान्स हार्बर मार्गावरील दिघा रेल्वे स्थानक येत्या नोव्हेंबर महिन्यात सुरू होणार असल्याने याचा मोठा दिलासा दिघा, चिंचपाडा वाशीयांना होणार आहे. त्याच बरोबर नवी मुंबईतील प्रवाशांना कल्याण डोंबिवलीकडे जाताना आणि कल्याण डोंबिवलीकरांना नवी मुंबईत येताना ठाणे स्टेशनला वळसा घालण्याची गरज भासणार नाही. कारण दिघा रेल्वे स्थानक आणि कळवा ऐलिव्हेटेड रेल्वे स्थानक होताच थेट ही दोन शहरे एकदुसर्याशी जोडली जाणार आहेत. आज दिघा रेल्वे स्थानकाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी खासदार राजन विचारे यांनी पाहणी दौरा केला. सद्या 60 टक्के पर्यंत काम पूर्णत्वास आले असून नोव्हेंबर महिन्यात दिघा रेल्वे स्थानक सुरू होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. या कळवा ऐलिव्हेटेड स्थानक आणि दिघा स्थानक यांच्यासाठी एकूण 428 कोटी खर्च अपेक्षीत आहे.
Continues below advertisement