Dhirendra Krishna Shastri : धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या मीरा-भाईंदरमधील कार्यक्रमाला तुफान गर्दी
abp majha web team
Updated at:
18 Mar 2023 07:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDhirendra Krishna Shastri : 'बागेश्वर धाम सरकार' (Bageshwar Dham) म्हणून प्रसिद्ध असलेले धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Maharaj) यांचा कार्यक्रम आज मीरा-भाईंदरमध्ये होत आहे. अंधश्रद्धा निमूर्लन समितीकडून विरोध होत असतानाही आज मीरा रोड परिसरात हा कार्यक्रम पार पाडत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही या कार्यक्रमाला परवानगी न देण्याची मागणी केली आहे. यादरम्यान, धीरेंद्र कृष्ण शास्त्री आज पहाटे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. यावेळी विमानतळावर उपस्थित शेकडो भक्तांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचं जोरदार स्वागत केलं.