Dharavi Redevelopment Work : धारावी पुनर्विकासासाठी मुंबईतील आणखी 125 एकर जागा देण्याचा निर्णय

Dharavi Redevelopment Work : धारावी पुनर्विकासासाठी मुंबईतील आणखी 125 एकर जागा देण्याचा निर्णय

 राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता उद्यापासून  लागण्याची शक्यता असताना  त्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Decision)  आज अनेक मोठ्या निर्णयांची घोषणा झाली.  राज्य सरकारने विधानसभा निवडणुकांची (Election) आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मंत्रिमंडळ बैठकांचा धडाका लावला आहे.राज्यातील विधानसभा निवडणुका लक्षात घेता ही शिंद सरकरची शेवटची मंत्रिमंडळ बैठक असण्याची शक्याता आहे.   या पार्श्वभूमीवर  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राज्य मंत्रिमंडळात मोठी घोषणा केली आहे.  मुंबईत पाचही टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी,  धारावी पुनर्विकासासाठी मुंबईतील 125 एकर जागा देण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत 19 निर्णय घेण्यात आले आहे. 

धारावी पुनर्विकासासाठी मुंबईतील 125  एकर जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला.  देवनार डम्पिंग ग्राउंडची 125 एकर जागा देण्याचा निर्णय घेतला आहे.  मागील मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोरिवलीची जागा दिल्यानंतर या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देवनार डम्पिंग ग्राउंडच  जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  धारावी पुनर्विकास अदानी समुह करत आहे. तसेच राज्यातील दोन मोठ्या नदी जोड प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.  दमणगंगा, गोदावरी नदी जोड प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे, 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola