Dharavi redevelopment ceremony : धारावी पुनर्विकासाचा नारळ फुटला; प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा पार
धारावीमध्ये ८५० कुटुंबांना घरे मिळणार, ३ हजार झोपडीधारकांचे पुनर्वसन होणार, सेक्टर ६ वा भागात झालेल्या भूमिपूजनाने रेल्वे कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आणि कार्यालये उभारण्याच्या कामाचाही शुभारंभ.
धारावी पुनर्विकासाचा नारळ फुटला ८५० कुटुंबांना मिळणार घरे, ३ हजार झोपडीधारकांचे होणार पुनर्वसन
मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील माटुंगा रेल्वे स्थानकानजीकच्या सेक्टर ६ मधील क्वॉर्टर्समध्ये राहणाऱ्या ८५० कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात येणार असून, त्यासाठी आता आहे त्या जागेवर नव्या तीन इमारती बांधल्या जाणार आहेत. धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत हे काम केले जाणार असून, या कामाचा गुरुवारी शुभारंभ करण्यात आला. नव्या तीन इमारतींचे काम तीन वर्षांत पूर्ण होईल, असा दावा धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडने केला असून, याव्यतिरिक्त याच जागेवरील सुमारे ३ हजार झोपडीधारकांनाही नवे घर दिले जाणार आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्पावर सातत्याने टीकेची झोड उठत असतानाच राज्य सरकारने अदानी समूहावर धारावी पुनर्विकासाचे काम सुरु आहे. त्यानुसार, धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडतर्फे माटुंगा येथील आपीएफ मैदानावर धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा पार पाडला. सेक्टर ६ वा भागात झालेल्या भूमिपूजनाने रेल्वे कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आणि कार्यालये उभारण्याच्या कामाचाही शुभारंभ झाला. धारावी पुनर्विकासाच्या निविदेनुसार, ही रेल्वे कर्मचायांची निवासस्थाने आणि कार्यालये सरकारकडे हस्तांतरित केली जाणार आहेत