Dhangar Reservation Mantralaya Andolan :धनगर आरक्षणासाठी मंत्रालयातल्या जाळ्यांवर आंदोलकांच्या उड्या
मुंबई : राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मराठा, ओबीसी, धनगर इत्यादि समजाकडून आपल्या वेगवेगळ्या मागण्यांना घेऊन सरकारकडे या मागण्या लावून धरल्या आहे. मात्र, राज्यात धनगड ही जातच अस्तित्वात नाही, असे वारंवार धनगर नेत्यांकडून सांगितले जात होते. आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाज आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे. यावर कुठलाही तोडगा निघत नसल्याने धनगर समाजाचे कार्यकर्ते मंत्रालयात आंदोलक करत आहे. यावेळी काही कार्यकर्त्यांनी आक्रमक पाऊल उचलले आणि थेट सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी मंत्रालयाच्या सुरक्षा जाळीवर उड्या मारल्या. पोलिसांनी सुरक्षा जाळीवर उतरून या आंदोलकांना बाहेर काढलं आहे.
धनगर आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस जोर धरत आहे. याच मुद्द्यावरून एक दिवसाआधी डॉ. सुधाकर शिंदे यांनी एक अहवाल दिला होता. ज्यामध्ये इतर राज्यांमध्ये धनगर समाजाला आदिवासींची प्रमाणपत्र दिल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. पाच राज्यांच्या अभ्यासामध्ये शिंदे समितीला काही पुरावे मिळाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. धनगर समाजाला आदिवासीमधून आरक्षण द्यायचं की नाही याबाबत स्थापन करण्यात आलेल्या शिंदे समितीचा जवळपास एक हजार पानांचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. हा अहवाल आज मंत्रिमंडळाच्या बैठकी समोर येणार होतो. पण मंत्रिमंडळाच्या बैठकी रद्द करण्यात आल्या. त्यामुळेच कुठे तरी धनगर समाज आज आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे.