Dhangar Community Meeting Mumbai : सरकार आणि धनगर नेत्यांची मुंबईतली बैठक संपली

Continues below advertisement

मराठा आंदोलनाची धग वाढत गेली आणि ओबीसी सुरु झाले... ती शांत होते न होते.. तोच आता राज्यभर धनगर आंदोलनाची धग जाणवू लागलीय.. आक्रमक धनगर समाजाची राज्यभर आंदोलनं सुरू असून, नगरच्या चौंडीत यशवंत सेनेच्यावतीने सुरु असलेल्या उपोषणाने टोक गाठलंय.. या आंदोलनावर आज तरी तोडगा निघेल असं वाटत होतं ... तोडग्यासाठी सरकार आणि धनगर नेत्यांची मुंबईत बैठकदेखील पार पडली.. पण दोन तास काथ्याकुट करुनही, सरकारला धनगर आंदोलनावर उपाय शोधता आलेला नसला.. तरी सरकारने या प्रश्नी समिती नेमत एक पाऊल पुढे टाकलंय, असं म्हणण्यास हरकत नाही. मात्र बैठकीला आलेल्या शिष्टमंडळाने हि आंदोलन सुरूच राहणार असे बैठकीनंतर घोषित केले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram