Dhahi Handi 2021 मनसेकडून ठाण्यात प्रतिकात्मक दहीहंडी साजरी; पोलिस-मनसैनिकांत संघर्ष

दादर आणि ठाण्यात आम्ही दहीहंडी साजरी करणार म्हणजे करणारच असा इशारा दिल्यानंतर मनसेनं नियम झुगारत अखेर दहिहंडी फोडलीच.  सणासुदीच्या काळात गर्दीवर नियंत्रण आणण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या होत्या. असं असतानाही दहीहंडी साजरी करण्याबाबत भाजप आणि मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.  ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवारी मध्यरात्री कोरोना निर्बंध झुगारुन दहीहंडी फोडली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी पोलिसांचे नियम धुडकावून दहीहंडी फोडत मनसेचा झेंडा फडकवला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola