COVID-19 Test | मुंबईत कोरोना चाचण्यांचं प्रमाण वाढवा, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस भीषण होत आहे. त्यातच मुंबईतील चाचण्या वाढवा असा सातत्याने आग्रह करत असताना सुद्धा मुंबईत जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये केवळ 14 टक्के अधिक चाचण्या करण्यात आल्या. हीच संख्या राज्याच्या बाबतीत 42 टक्के आहे. त्यामुळे मुंबईत तातडीने चाचण्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.