Navi Mumbai : 'मला वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे' : Devendra Fadnavis
आजही मुख्यमंत्री असल्याचं वाटतं, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केलंय. बेलापूरमध्ये महिला मासळी विक्रेता परवाना वितरणाच्या शुभारंभ सोहळ्यात ते बोलत होते. मंदा म्हात्रे, गणेश नाईक, नरेंद्र पाटील, रमेश पाटील यांच्यासारखे नेते पाठीशी असल्यामुळे मी आजही मुख्यमंत्री असल्याचीच भावना आहे. जनतेनंही जाणवू दिलं नाही की मुख्यमंत्री नाही.. नाराज भाजप आमदार मंदा म्हात्रेंचं कौतुक करताना फडणवीसांनी हे वक्तव्य केल्यानं राजकीय वर्तुळात आता चर्चेला नवा विषय मिळालाय.